आमच्याबद्दल
आपले कालवी हे गाव गोदावरी नदीच्या तीरावर बसलेले आहे. गावाची एकूण लोकसंख्या २०११ नुसार ६९८ इतकी आहे. गावामध्ये अतिप्राचीन महादेव मंदिर आहे. सदर मंदिरामध्ये महाशिवरात्रीला दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात यात्रा उत्सव होत असतो. गावापासून २ किमी अंतरावर नाशिक ते संभाजीनगर हायवे आहे. तसेच गावापासून १२ किमी अंतरावर नाशिक रोड रेल्वे स्टेशन आहे. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे.